आई-वडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी उच्च शिक्षणाची कास धरा- अब्दुल हफिज,हजरत खानेआलम मा.विद्यालयात मुलांना निरोप सभारंभ

वसमत (प्रतिनिधी) स्वतःहा च्या जीवाचे रान करून तुम्हाला उच्च पदावर पाहण्यासाठी अहोरात्र धडपडणाऱ्या आई-वडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणाची कास धरावी असे आवाहन  दहावीच्या निरोप समारंभ प्रसंगी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना अब्दुल हफिज यांनी केले आहे

समर्थ सेवाभावी संस्था संचलित हजरत खाने आलम मा.विध्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुलाम हुसेन परभणी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून संचालक बदर चाऊस, फेरोज शफीउल्ला पठान,हरून भाई दालवाले, शेख युनुस  डॉक्टर मौलाना,अन्सारी आदींची उपस्थिती होती

संस्थेचे अध्यक्ष अ.हफीज अ.रहेमान यांनी यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधून आजच्या आधुनिक युगात स्पर्धेत टिकण्यासाठी उच्च शिक्षण किती गरजेचे आहे या बाबत विविध उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शेख  अख्तर यांनी केले संचलन शाळेच्या विद्यार्थिनी हुस्नफारिया,मसीरा इर्रम यांनी केले आभार अब्दुल अतिक यांनी मानले शाळेचे मु.अ.सय्यद रशिद शिक्षक,  
कर्मचारि वर्गाने कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले
.

News Category: 
Basmat

Sharing