40 हजार रुपयाची लाच स्वीकारताना मुख्याध्यापकास एसीबीने रंगेहात पकडले

वसमत (प्रतिनिधी)
छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालय पूर्णा साखर कारखाना चे मुख्याध्यापक भगवान लहाने यांना 40 हजार रुपयाची लाच स्वीकारताना एसीबी ने रंगेहात पकडले
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार या तील तक्रारदार हे श्री.शिवाजी माध्यमिक विद्यालय, पूर्णा सहकारी साखर कारखाना , ता.वसमत जि. हिंगोली या शाळेत अनुकंपा तत्वावर शिपाई या पदांवर प्रथम तीन वर्ष मानधनावर दि.01/11/ 2022 रोजी रुजु झाले आहेत. तक्रारदार यांचा शालार्थ प्रणाली मध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी प्रस्ताव माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद हिंगोली येथे पाठविण्याकरिता लोकसेवक यांनी पंचा समक्ष 60,000/- रु लाचेची मागणी करून पहिला हप्ता 40,000/-रु लाचेची रक्कम आज रोजी पंचा समक्ष स्वतः स्विकारली आहे. लाचेच्या रक्कमेसह लोकसेवक भगवान नारायण लहाने वय 57 वर्षे, पद-मुख्याध्यापक श्री शिवाजी माध्यमिक विद्यालय, पूर्णा सहकारी साखर कारखाना , ता वसमत,जिल्हा - हिंगोली यांना रंगेहाथ पकडण्यात आले असुन ताब्यात घेण्यात आले आहे .पोलीस ठाणे वसमत ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्याची पुढील प्रक्रिया चालू आहे.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाधिक्षक निलेश 'सुरडकर, पोलीस निरीक्षक प्रफुल अंकुशकर, विजय पवार, जमादार तानाजी मुंडे, ज्ञानेश्वर पंचलिंगे, राजेंद्र वर्णे, भगवान मंडलिक, गोविंद शिंदे, गजानन पवार, शिवाजी वाघ, राजाराम फुफाटे, शेख अकबर यांच्या पथकाने शाळेच्या परिसरात सापळा रचून ही कार्यवाही केली