पळशीच्या "त्या" जवानाच्या आत्महत्येस कारणीभूत पत्नी चा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला

वसमत (प्रतिनिधी)
पळशी ता.वसमत जिल्हा हिंगोली येथील जवानाच्या आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या पत्नी चा अटकपूर्व जामिन शुक्रवारी जालना येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला आहे.

पळशी ता.वसमत जिल्हा हिंगोली येथील जवानाच्या पत्नीचे त्याच्या मित्र सोबत  संबंध असल्याचे समजल्याने निराश होऊन जवानाने जालना परिसरात काकीनाडा एक्सप्रेस ने औरंगाबाद हुन परभणी कडे प्रवास करत असताना रेल्वेतुन उडी घेऊन आत्महत्या केल्या नंतर त्याच्या पत्नी व आणखी एका विरुद्ध कलम ३०६ व ३५ भा.द.वि नुसार तालुका जालना पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा क्र. २१६/२०२३ नोंदविल्या नंतर जवानांच्या पत्नीने अटकपूर्व जामीन जिल्हा व सत्र न्यायालय जालना येथे दाखल केला होता व त्यांना तात्पुरता जामीन मंजूर झाल्याने तक्रारकर्ता तर्फे वकील अरविंद जाधव यांनी प्रकरणात हजर होऊन युक्तिवाद केल्या नंतर उपविभागीय पोलीस अधिकारी यांना प्रत्यक्ष सुनावणीस हजार राहून तक्रारकर्ताचे वकील व उपविभागीय पोलीस अधिकारी याची बाजू ऐकल्या नंतर जवानांच्या पत्नीचा अटकपूर्व जमीन ना मंजूर केल्या नंतर आरोपीने जामीन अर्ज मागे घेतला not prss केला तक्रारकर्ता तर्फे वकील अरविंद जाधव युक्तिवाद केला.

News Category: 
Maharashtra

Sharing