"त्या" घटनांच्या निषेधार्थ वसमत बंद,उपविभागीय अधिका-यांना देण्यात आले निवेदन,शहर पोलीसांनी ठेवला चोख बंदोबस्त


वसमत (प्रतिनिधी)
महापुरुषां बद्दल इन्स्टाग्रामवर आपत्तीजनक पोस्ट प्रसारित करुन धार्मीक भावना दुखावल्या बद्दल तसेच नांदेड जिल्ह्यतील गोरक्षाच्या हत्ये प्रकरणी संबंधितांवर कार्यवाहीसाठी गुरुवारी वसमत शहर बंद पाळण्यात आला आहे
इन्स्ट्राग्राम आय डी वरुन महाराष्ट्राच्या महापुरुषाचे बद्दल आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित करण्यात आली असुन सबंध महाराष्ट्रातील समाज बांधवांच्या धार्मीक भावना दुखावल्या आहेत सदर प्रकरणाची गांभिर्याने दखल घेवून विकृत मानसीकतेच्या इसमावर तातडीने गुन्हा दाखल करुन आरोपींना अटक करण्या बाबत तक्रार अर्ज सोमवारी शहर पोलीसात देण्यात आला होता
दरम्यान आरोपीस अटक करण्यात यावी तसेच नांदेड जिल्ह्यतील गोरक्षकाच्या हत्ये प्रकरणी संबंधितांवर कठोर कार्यवाहिच्या मागणी साठी गुरू पादेश्वर शिवाचार्य महाराज गिरगाव यांच्या नेतूत्वाखाली गुरुवारी वसमत बंद पाळण्यात आले सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करुन उपस्थित जनसमुदाय शहरातील मुख्य बाजारपेठ मार्गाने उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे पोहचला या वेळी निवेदन देण्यात आले
जिल्हा पोलीस अधिक्षक जी.श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम व त्यांच्या टीम ने चोख बंदोबस्त ठेवला होता