अग्नीशस्त्र,तलवार,खंजीर बेकायदेशीर हत्यार बाळगल्याप्रकरणी वसमत येथील एक ताब्यात,स्थानिक गुन्हे शाखा पथकाची धडक कारवाई

समत (प्रतिनिधी) बेकायदेशीररीत्या अग्नीशस्त्रासारखे हुबेहुब दिसणारे लोखंडी लायटल आणि लोखंडी तलवार व खंजीर बाळगल्या प्रकरणी शनिवारी स्थानिक गुन्हे शाखा पथकाने कार्यवाही करत पवन प्रल्हाद पालेवार,वय २१ ह.मु.वसमत यास शस्त्रासह ताब्यात घेवुन त्याचे विरूध्द पो.स्टे.वसमत शहर येथे विविध कलमानवये गुन्हा दाखल केला आहे

मा.पोलीस अधीक्षक हिंगोली यांचे आदेशाने हिंगोली जिल्हयात अवैध धंद्यांविरुध्द व बेकायदेशीररीत्या शस्त्र बाळगणाऱ्या विरूध्द कार्यवाहीची “विशेष मोहिम राबवीण्यात येत असुन त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक  पंडीत कच्छवे यांनी स्थागुशा येथील पोलीस अधिकारी,पोलीस अंमलदार यांचे पथक तयार करून हिंगोली जिल्हा हद्दीत गोपनिय माहिती काढुन कार्यवाहीचे आदेश दिल्याने पोउपनि विक्रम विठुबोने यांचे पथकाने   मिळालेल्या गोपनिय माहितीवरून दिनांक ३०.०९.२०२३ रोजी इसम नामे पवन प्रल्हाद पालेवार,वय २१ वर्ष, रा.सावळी तांडा, ता.औंढा ना. ह.मु.वसमत हा बेकायदेशीररीत्या अग्नीशस्त्रासारखे हुबेहूब दिसणारे लोखंडी लायटल व लोखंडी तलवार,खंजीर बाळगतांना मिळुन आल्याने त्यास शस्त्रासह ताब्यात घेवुन त्याचे विरूध्द पो.स्टे. वसमत शहर येथे कलम ४/२५, ६ / २८ भा. ह. का अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री जी. श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील,स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.श्री पंडीत कच्छवे,यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि विक्रम विठुबोने, पोलीस अंमलदार सुनिल अंभोरे, नितीन गोरे, किशोर सावंत, आजम प्यारेवाले, विशाल खंडागळे यांनी केली आहे.

प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली बीट अमालदार सोनटक्के, गजानन भोपे करीत आहेत

News Category: 
Basmat

Sharing