आ.राजुभैय्या नवघरे अध्यक्ष असलेल्या संस्थेला विविध तीन महाविद्यालय मंजूर,विद्यार्थ्यांसाठी वसमत बनणार शिक्षणाचे हब

वसमत (फेरोज पठाण)
महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस वसमतचे आमदार राजुभैय्या नवघरे अध्यक्ष असलेल्या संस्थेला विविध तीन महाविद्यालय मंजूर केले आहेत ही वसमत करांसाठी आनंदाची बाब असुन भविष्यात वसमत शिक्षणाचे हब बनणांर असल्याचे चित्र दिसत आहे

महाराष्ट्र शासन नवीन महाविद्यालयांसाठी दरवर्षी इरादापत्र जाहीर करते. या संदर्भात यंदाचा शासनाचा 'जीआर' नुकताच निघाला असून त्यामध्ये मराठवाड्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना झुकते माप देण्यात आले आहे.

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे सर्वात जुने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आहे. त्या अंतर्गत यावर्षी नवीन अकरा महाविद्यालयांना इरादा पत्रद्वारे परवानगी देण्यात आली आहे. त्या पैकी तीन विधी महाविद्यालय आहेत . 

तसेच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत  असलेल्या ना.अजितदादा पवारांचे विश्वासू आमदार चंद्रकांत उर्फ राजू नवघरे हे अध्यक्ष असलेल्या ग्रामोदय सेवाभावी संस्था बाबुळगाव,तालुका वसमत, जिल्हा हिंगोली या संस्थेला तीन नवीन  महाविद्यालय मंजूर करण्यात आले आहेत. 
त्यामध्ये एक वसुमती विधी महाविद्यालय, दुसरे कै.गोपाळराव पाटील ग्रामीण व्यवस्थापन महाविद्यालय व तिसरे राजे संभाजी व्यावसायिक व कौशल्य विकास वरिष्ठ महाविद्यालय मंजूर करण्यात आले आहेत. 

आ. नवघरे यांच्या पुढाकरातून या महाविद्यालयामुळे विविध क्षेत्रातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पर जिल्ह्यात जाण्या पासून मुक्ती मिळणार असून आपल्याच गाव तालुक्यातच शिक्षण घेण्याचे स्वप्न साकार होणार आहेत

News Category: 
Basmat

Sharing