हिंगोली जिल्हयातुन हरवलेले व चोरी गेलेले तब्बल ५० मोबाईल जप्त,अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील यांच्या हस्ते मुळ मालकास परत केले मोबाईल

हिंगोली (महेंद्र पुरी)हिंगोली जिल्हयातुन मागील काही महिन्यात हरवलेले व चोरी गेलेले तब्बल ५० मोबाईल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केले असून अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या हस्ते सदर मोबाईल मूळ मालकास परत करण्यात आले आहे
हिंगोली जिल्हयात मागील काही महिन्यामध्ये मोबाईल चोरीचे प्रमाण वाढले होते त्याअनुषंगाने हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक मा. श्री जी. श्रीधर व मा. श्रीमती अर्चना पाटील अपर पोलीस अधीक्षक हिंगोली यांच्या आदेशा प्रमाणे स पोलीस निरीक्षक श्री एस. एस.घेवारे यांच्या नियंत्रणात एक विशेष पथक स्थापन करण्यात आले होते.
विशेष पथकाने हिंगोली जिल्हयातील हरवलेले व चोरी गेलेले मोबाईल संदर्भाने तांत्रीक विश्लेषण व गोपनिय माहिती काढुन एकुण ५० अॅन्ड्राईड मोबाईल किं.अं. ६,०,००००/- रुपयाचे जप्त केले आहेत. सदर कार्यवाही दरम्यान पोस्टे कळमनुरी, पोस्टे हिंगोली ग्रामीण व पोस्टे हिंगोली शहर येथे एकुण सहा आरोपी विरुध्द गुन्हे दाखल करुन त्यांना अटक करण्यात आलेली आहे.
सदर जप्त करण्यात आलेले मोबाईल मा. पोलीस अधीक्षक जी. श्रीधर व मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील यांच्या हस्ते पोलीस अधीक्षक कार्यालय हिंगोली येथे मोबाईल धारकास बोलावुन घेवुन त्यांना परत केले आहेत.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक जी. श्रीधर व मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील, मा. पोलीस निरीक्षक श्री उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली स.पोलीस निरीक्षक एस. एस. घेवारे, पोलीस अंमलदार गजानन पवार, प्रमोद थोरात, जयप्रकाश झाडे, दत्ता नागरे, रोहीत मुदीराज, इरफान पठाण, दिपक पाटिल यांची नेमणुक करण्यात आली आहे. तसेच स्थागुशाचे पोलीस अमलदार संभाजी लेकुळे, सुनिल अंभोरे, गजानन पोकळे, गणेश लकुळे, ज्ञानेश्वर पायघन व प्रशांत वाघमारे यांनी पार पाडली आहे.