शुक्रवारी शिरडशाहपुर येथे भव्य शेतकरी व कार्यकर्ता मेळावा,मा.अजितदादा पवार यांच्या  हस्ते आदिवासी आश्रम शाळेची पायाभरणी

आ राजू भैया नवघरे यांच्या प्रयत्नाने उभारला जातोय ३२ कोटीचा प्रकल्प

वसमत (प्रतिनिधी) वसमत विधानसभेचे आमदार राजू भैया नवघरे यांच्या प्रयत्नाने शिरड शहापूर येथे आदिवासी मुला- मुलींच्या आश्रम शाळेसाठी ३२ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून या प्रकल्प उभारणीचा पायाभरणी सोहळा भव्य शेतकरी व कार्यकर्ता मेळावा १० फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता शिरड शहापूर येथे विधानसभा विरोधी पक्षनेते मा.ना.अजितदादा पवार, विधानसभा उपाध्यक्ष मा.ना.नरहरी झिरवळ यांच्या शुभहस्ते संपन्न होत आहे

आयोजित पायाभरणी सोहळा व शेतकरी मेळावा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय साखर महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर हे राहणार आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा,माजी आमदार संतोष टार्फे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे चिटणीस अब्दुल हफिज अब्दुल रहेमान,अजित मगर, सतीश पाचपुते आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे

वसमत विधानसभा मतदार संघातील शेतकऱ्यांच्या व्यथा व समस्या जानुन घेवून सरकार समोर मांडण्यासाठी  मा.ना.अजितदादा पवार व मा. ना. नरहरी झिरवळ  आपल्या भेटीला येत असून सर्व शेतकरी बांधव, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार राजू भैया नवघरे यांनी केले आहे

News Category: 
Maharashtra

Sharing