*सामाजिक बांधिलकी जोपासत पत्रकारांनी कुटुंबीयांकडेही लक्ष द्यावे-डाॅ. विश्वासराव आरोटे,विश्वासराव आरोटे यांची वसमतला धावती भेट


नांदेड,(प्रतिनिधी)- पत्रकार हा समाजातील एक महत्त्वाचा घटक आहे. देशभरात, राज्यात ,आपल्या जिल्ह्यात व गावात काय चालू आहे यावर बारकाईने लक्ष ठेवत पत्रकाराने सामाजिक बांधिलकी जोपासत आपल्या कुटुंबीयांकडेही लक्ष द्यावे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेश सरचिटणीस डॉक्टर विश्वासराव आरोटे यांनी केले.
पंधरा वर्षापूर्वी नांदेडमध्ये मुहूर्तमेढ रोवण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या नूतन कार्यकारिणी निवडीसाठी ते आज नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी जिल्हाध्यक्षपदी संग्राम मोरे तर प्रदेश कार्यकारिणी सदस्य संपादक रूपेश पाडमुख यांची सरचिटणीसपदी निवड जाहीर केली.प्रदेश सरचिटणीस डॉ.विश्वासराव आरोटे व प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ.अभयकुमार दांडगे यांच्या उपस्थितीत नांदेड जिल्हा कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची मुहूर्तमेढ पंधरा वर्षापूर्वी नांदेडमध्ये रोवण्यात आली. दरवर्षी वृत्तपत्र क्षेत्रातील प्रत्येक घटकांत सेवा देणार्यांना सन्मान करत त्यांना प्रोत्साहीत करत दरवर्षी संघाचे कॅलेंडर, वृत्तपत्र विक्रेता अपघात विमा पॉलीसी काढण्यासह विविध उपक्रम सातत्याने राबवण्यात येत असतात.पत्रकार संघाची काल प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ.अभयकुमार दांडगे व संघाचे ब्रँड अॅम्बासॅडर संजय फुलसुंदर यांच्या उपस्थितीत नांदेड जिल्हा कार्यकारिणीची निवड प्रक्रिया घेण्यात आली. त्यात जिल्हाध्यक्षपदी सिडकोचे अध्यक्ष संग्राम मोरे यांचा एकमेव अर्ज तर व सचिवपदी रूपेश पाडमुख यांचा नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले तर दक्षिण जिल्हा अध्यक्ष पदासाठी तीन नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले आहे त्यामुळे जिल्ह्यातील पदाधिकारी, सदस्य यांच्या उपस्थितीत खेळी-मेळीच्या वातावरणात निवड करण्यात आली.
सदरील निवड सोहळ्याची सुरूवात आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून करण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बापूसाहेब पाटील यांनी केले. प्रदेश सरचिटणीस आरोटे यांनी वृत्तपत्र क्षेत्रात काम करत असताना अगोदर परिवार सांभाळा असे भावनीक आवाहन करताना सामाजीक उपक्रमातून संघटना मजबूत करण्याच्या सूचना केल्या. यावेळी डॉ. अभयकुमार दांडगे यांनीही मोलाचे मार्गदर्शन करून प्रास्ताविकात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा इतिहास सांगितला व नूतन पदाधिकार्यांना शुभेच्छा दिल्या.
डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल प्रदेश सरचिटणीस डॉ.विश्वासराव आरोटे यांचा खोबरे-खारीकाचा मोठा हार टाकून व मिठाई वाटून आनंद व्यक्त करण्यात आला. शेवटी आभार सरचिटणीस तथा संपादक रूपेश पाडमुख यांनी मानले.
------------------------------------
विश्वासराव आरोटे यांची वसमतला धावती भेट
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे सर यांनी बुधवारी रात्री वसमत येथे धावती भेट दिली व संघटनेचे ध्येयधोरण बाबत पत्रकारांशी चर्चा करून संघटनेच्या स्थानिक कार्याचा आढावा घेतला
या वेळी हिंगोली जिल्हाध्यक्ष प्रद्युम्न गिरीकर,वसमत तालुका अध्यक्ष फेरोज पठाण,शेख इस्माईल,अशोक गुंडाळे, अय्युब पठाण,शेख अफसर,शेख खदीर,चंदू वैद्य,श्याम शेवाळकर,शेख इलयास,अनिल पंडित, खदिर अहेमद,नागेश चव्हाण आदी पत्रकारांची उपस्थिती होती
अमेरिकन विद्यापीठाची डि-लीट पदवी मिळाल्याबद्दल विश्वासराव आरोटे यांचा सत्कार करून त्यांच्या पुढील वाटचालीस पत्रकारांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या