हरियाणाच्या "त्या" हत्याकांड प्रकारणातील आरोपितांना फाशी द्या.!,राष्ट्रीय किसान मोर्चा व राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा चे राष्ट्रपतींना पत्र

वसमत (प्रतिनिधी)
राज्यस्थान च्या भरतपुर जिल्ह्यातील जुनैद व नासिर नावाच्या युवकांची हरियाणा गोपालगढ पोलीस ठाणे हद्दीत झालेल्या "त्या" जघन्य हत्याकांड प्रकरणातील आरोपितांवर कठोर कार्यवाही करुन त्यांना फाशीची शिक्षा देण्याची लेखी मागणी राष्ट्रीय किसान मोर्चा व राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाने राष्ट्रपतींना पाठवलेल्या पत्रकाद्वारे केली आहे
दोन्ही संघटना कडून सोमवारी दुपारी वसमत उपविभागीय अधिकारी वसमत मार्फत राष्ट्रपती महोदय भारत सरकार यांना पाठवलेल्या लेखी पत्रात नमूद करण्यात आले की राज्यस्थान येथील भरतपुर जिल्ह्यातील जुनैद व नासिर नावाचे युवक हरियाणा राज्यात आपल्या सासरवाडीत गेले होते परत येताना त्या युवकांची गाडी हरियाणाच्या गोपालगढ पोलीस ठाणे हद्दीत अडवून द्वेषापोटी दोघांची निर्घृण हत्या करुन पुरावे नष्ट करण्याचे उद्देशाने दोघाना त्यांच्याच बोलेरो गाडीत सीटबेल्ट ने बांधून जाळल्याची माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे
या जघन्य हत्याकांडात सहभागी आरोपितांवर कठोर कार्यवाही करुन त्यांना फाशीची शिक्षा द्यावी तसेच क्राईम इन्वेस्टीगेशन एजन्सी (सी.आय.ए) ची चिकशी करुन दोषीना निलबीत करुन त्यांच्यावरही कार्यवाही करण्याची मागणी बालाजी कानोडे,भास्कर सूर्यवंशी, राजेश कानोडे, संतोष राऊत,शेख सुफियान,शेख युनुस,राजेश राऊत,शेख इसरार ल,शेख खालेख, अब्दुल रहमान, शेख करीम,माहीरो राऊत, सौदागर,शेख मसुद शेख इब्राहिम,अनिल कांबळे आदींनी केली आहे